
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्टचा ‘सरफरोश’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर आमीर खान चॉकलेट बॉयच्या भूमिकांव्यतिरिक्त कणखर भूमिकाही करू शकतो हे सिद्ध झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून आमीरच्या चाहत्यांकडून या चित्रपटाच्या सिक्वेल तयार करावा अशी मागणी होत आहे. आमीरच्या चाहत्यांची ही मागणी पूर्ण होणार असली तरी ही बातमी वाचून त्यांची नक्कीच निराशा होणार आहे. कारण या चित्रपटात आमीर खानच्या जागी जॉन अब्राहीम हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सरफरोशचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांची सरफरोश २ साठी जॉन अब्राहीमसोबत चर्चा सुरू आहे. सरफरोशच्या या सिक्वेलमध्ये देशातील नक्षलवाद्यांसोबतचा लढा दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री तसेच इतर भूमिकांमध्ये कोण दिसणार ते अद्याप निश्चित झालेले नाही. हा चित्रपटाचे शूटींग या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची देखील चर्चा आहे.
summary : John Abraham will be replacing Aamir Khan in Sarfarosh 2






























































