मीना कुमारी यांच्या आयुष्यातील या ८ गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jdhfndnsjid

सामना ऑनलाईन। मुंबई

बॉलिवूडची ट्रॅजेडी क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज ८५ वा जन्मदिवस आहे. मीना कुमारी यांचा जन्म मुंबईत १ ऑगस्ट १९३२ साली झाला. त्यांचे खरे नाव महजबी बानो होते. त्यांचे वडील अली बख्त अभिनेते होते. पारशी रंगमंचावर ते आपली कला सादर करायचे. तर मीना कुमारी यांच्या आई देखील थिएटर कलाकार होत्या. यामुळे अभिनय मीना कुमारी यांच्या रक्तातच भिनला होता. आपल्या दमदार अभिनयाने ९० चित्रपट गाजवणाऱ्या त्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एकमेव अभिनेत्री होत्या.

meena-kumari-1

मीना कुमारी यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते होते. अनेक कलाकार त्यांच्या सौंदर्याचे दिवाने झाले होते. मीना कुमारी जेव्हा सेटवर चित्रपटाचा डायलॉग बोलायच्या किंवा अॅक्टिंग करायच्या तेव्हा सुपरस्टार राजकुमार त्यांच्याकडे एकटक बघत राहायचे. अनेकवेळा मीना कुमारी यांना बघून राजकुमार डायलॉगही विसरायचे.

meena-kumari-rajkumar

मीना कुमारी यांचा उत्तुंग अभिनय पाहता त्यांना बॉलिवूडने फिमेल गुरु दत्त असे नावही दिले होते. त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी कलाकारांमध्ये चढाओढ लागायची.

मीना कुमारी यांना खरी ओळख मिळवून दिली ती १९५२ साली आलेल्या बैजू बावरा या चित्रपटाने . एका रात्रीत त्या सुपरस्टार झाल्या होत्या. मीना कुमारी हे नाव साता समुद्रापारही पोहचलं होतं.

बैजू बावरा चित्रपटात मीना कुमारी यांच्याबरोबर भारत भूषण काम करत होते. ते ही मीना कुमारी यांचे चाहते होते. चित्रपटाच्या शुटींगदरम्यान त्यांनी मीना कुमारी यांना लग्नाची मागणी घातली होती. पण मीना कुमारी यांनी अत्यंत नम्रपणे त्यांना नकार दिला.

baiju-bawara

१९५१ साली मीना कुमारी यांची ओळख कमाल अमरोही यांच्याबरोबर झाली होती. त्याचदरम्यान मीना कुमारी यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी कमाल यांनी दिवस रात्र मीना कुमारी यांची सूश्रूषा केली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. १९५२ मध्ये दोघांनी गुपचूप निकाह केला. पण निकाहचं हे गुपित फार काळ टिकलं नाही. त्यानंतर मीना कुमारी व कमाल यांच्यात हळूहळू दुरावा वाढला. अखेर १९६४ साली दोघे विभक्त झाले.

meena-kamal

कमाल यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर मीना कुमारी व धर्मेंद्र यांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर पाकीजा या चित्रपटासाठी कमाल यांनी धर्मेंद्र यांना साईन केले होते. पण मीना कुमारी व धर्मेंद्र यांच्यातील अफेयरच्या चर्चांमुळे कमाल यांनी धर्मेंद्रला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. मीना कुमारी यांच्या एका शब्दावर धर्मेंद्र यांना चित्रपट मिळू लागले होते. पण नंतर धर्मेंद्र यांनी मीना कुमारी यांच्याकडे पाठ फिरवली .यामुळे निराश झालेल्या मीना कुमारी खऱ्या अर्थाने ट्रॅजिडी क्विनचं आयुष्य जगू लागल्या.

meena-dhrmendra-12

प्रेमात अयशस्वी झाल्याने मीना कुमारी वैफल्यग्रस्त झाल्या होत्या. आपले दु:ख विसरण्यासाठी त्या मद्य पिऊ लागल्या. दिवसागणिक त्यांचे पिणे वाढले व त्यामुळे त्यांना लिव्हर सोरायसिस झाला.

meena-kumari-drink

पाकिजा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही आठवडयानंतरच म्हणजे ३१ मार्च १९७२ मध्ये त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या अवघ्या ३९ वर्षाच्या होत्या.