
सामना ऑनलाईन ।हैदराबाद
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जजिरा एअरवेजच्या विमानात मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. जे९-६०८ कुवैत – हैदराबाद या विमानातील इंजिनात ही आग लागली होती. विमान हैदराबाद विमानतळावर उतरताच विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनात आग लागल्याचे हवाई यंत्रणेच्या कर्मचार्यांच्या लक्षात आले. त्यानंतर विमानातील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवण्यात आले. तातडीने विमानाचे इंजिन बंद करण्यात आले. आग किरकोळ असली तरी ती वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. विमानात १५० प्रवासी होते.


























































