IND VS ENG TEST : अश्विनच्या ‘अॅक्शन रिप्ले’ने कुकची बत्ती गुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघामध्ये बर्मिंघममध्ये पहिला कसोटी सामना रंगला आहे. सामन्याचा दुसरा दिवस विराट कोहलीच्या नावावर राहिला असला तरी शेवटच्या मिनिटाला आर. अश्विनने आपल्या फिरकीचा प्रताप दाखवला. अश्विनच्या घुमणाऱ्या चेंडूपुढे कुक पुन्हा एकदा बोल्ड झाला. हा चेंडू हुबेहुब पहिल्या डावातील चेंडूप्रमाणेच होता. पहिल्या डावातही अश्विनने कुकुला अशाच पद्धतीने बाद केले होते. पहिल्या डावातील अॅक्शन रिप्ले दुसऱ्या डावातही दिसला.

हे देखील वाचा – एक डाव विराटचा! सचिन-ब्रॅडमन यांनाही टाकले मागे

कुक आणि अश्विनचा ३६ चा आकडा
अश्विन आणि कुकचा कसोटी क्रिकेटमध्ये ३६ चा आकडा आहे. इतरवेळी गोलंदाजांवर हुकुमत गाजवणारा हा इंग्लिश खेळाडू अश्विनपुढे मात्र गरीब गाय होऊन खेळतो. गुरुवारी अश्विनने कुकला कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ९ व्यांदा बाद केले. अश्विनने ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज वॉर्नरचीही ९ वेळा शिकार केली आहे. यासोबतच अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये कुकला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या जॉन्सन आणि बोल्टच्या विक्रमाची बरोबरी केली. दोघांनीही कुकला ९ वेळा बाद केले आहे. कुकला कसोटीत सर्वाधिक वेळा मॉर्केलने (१२ वेळा) बाद केले आहे.

कुकचा खराब विक्रम
अश्विनकरवी दुसऱ्या डावात बोल्ड झाल्यानंतर कुकच्या नावावर एका खराब विक्रमाची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात बोल्ड होण्याची कुकची पहिलच वेळ आहे.