पाणीपुरी खायची स्पर्धा ‘फिक्स’ केली, स्पर्धक भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

गुजरातच्या अनेक शहरांमध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. एकीकडे ही बंदी असताना दुसरीकडे अहमदाबादमध्ये पाणीपुरी खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आश्चर्याची बाब ही आहे की या स्पर्धेला स्वत: तिथल्या महापौर बिजल पटेल आल्या होत्या. पाणीपुरीवरील बंदी योग्य असून इथली पाणीपुरी चांगलं जिन्नस वापरून बनवत असल्याचा दावा पटेल यांनी वाद टाळण्यासाठी केला. त्यांनी जरी वाद टाळला असला तरी या स्पर्धेचे आयोजक मात्र वादात सापडले आहेत.

या स्पर्धेतील १२५ स्पर्धकांनी एकूण १६ हजार पाणीपुरी गटकावल्या. सर्वाधिक पाणीपुरी खाणाऱ्याला बक्षिस ठेवण्यात आलं होतं यामुळे प्रत्येक स्पर्धकांनी खात असताना आपण किती पाणीपुरी खातोय याचा हिशोब ठेवला होता. जेव्हा बक्षिस जाहीर झालं तेव्हा कमी पाणीपुरी खाणाऱ्या व्यक्तीला ते देण्यात आल्याने इतर स्पर्धेक जाम भडकले होते. ज्या स्पर्धकाला बक्षिस दिलं ती व्यक्ती आयोजकांची नातेवाईक असल्याने इतर स्पर्धक आणखीनच भडकले होते.