
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेस आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत रामकुमार रामनाथन याच्यासोबत खेळणार असल्याचे कर्णधार झेशान अली यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याआधी रोहन बोपण्णा व दिवीज शरण तसेच लिएण्डर पेस व सुमीत नागल या जोड्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार होत्या.


























































