‘भगवा तर फडकाणारच’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंधानेर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसैनिक कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी केले. कन्नड तालुक्यातील ‘भगवा तर फडकवणार’च मोहिमेत उपळा कालीमठ येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, तालुकाप्रमुख केतन काजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या मोहिमेत मंगळवारी अंधानेर पंचायत समिती गणअंतर्गत जवळपास १२ गावांसह तांडावस्तीत या मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मुंडवाडी, आंबा, आंबा तांडा, सातकुंड, तेलवाडी, अंबाला, लंगडा तांडा, उपळा आदी गावत शिवसेना पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी निरीक्षक उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, अशोक दाबके, उपतालुकाप्रमुख राजू राठोड, विभागप्रमुख गुलाबराव साळुंके, उपविभागप्रमुख सोपान गोलाईत, युवासेना, शिवसेना, महिला आघाडी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

ताडपिंपळगाव : तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठीच ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू, असे तालुकाप्रमुख केतन काजे म्हणाले. कन्नड तालुक्यातील भगवा तर फडकावणारच मोहिमेला उत्स्पूâर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे यांनी केले.

यावेळी निरीक्षक म्हणून उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, दीपक बोडखे, सतीश शेळके आदींनी गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांचा  आढावा घेतला. या बैठकीत गावागावातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, सोसायटी सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकत्र्या, युवासेना पदाधिकारी, युवासैनिक आदींची उपस्थिती होती.

नाचनवेल : राज्यात शिवसेनेला वातावरण अत्यंत चांगले असून, शिवसैनिकांनी यापुढेही जाऊन शिवसेनेचे विचार वाड्या- वस्त्यांवर पोहचवून भगवा फडकाविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल यांनी केले. ‘भगवा तर फडकावणारच’ या मोहिमेअंतर्गत ते मोहरा येथे बोलत होते. नाचनवेल गणातील आडगाव (पिशोर), टाकळी(शाहू), मोहरा, डोंगरगाव, आमदाबाद, सारोळा, जवखेडा (बु.), जवखेडा (खु.), मोहाडी, दिगाव, खेडी येथे शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, (सिल्लोड) शिवसेना विभागप्रमुख संजय पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. शाखाप्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिकांना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपविभागप्रमुख रामराव ढमाले, शिवाजी थोरात, वसंत भोसले, विभागप्रमुख रामेश्वर काळे (शिवना), उपशहरप्रमुख दशरथ बरडे, उपसरपंच राजेंद्र गाडेकर, गोरख आरते, कारभारी पवार, दिगंबर गाडेकर, प्रभाकर खंबाट, विष्णू टेलर, भाऊसाहेब भोसले, ज्ञानेश्वर चिकणे, विलास खंबाट, विनायक चौधरी, शिवराम खंबाट, लक्ष्मण गाडेकर, सुनील गाडेकर, धोंडिबा गाडेकर, पांडुरंग खंबाट, यादव बनकर, समाधान बनकर, शहाजी बनकर, विजय खंडागळे, अशोक गायकवाड, शंकर आग्रे, भाऊसाहेब आग्रे, रामेश्वर आग्रे, गजानन म्हस्के, वैâलास धनगे, आप्पा टकले, एकनाथ लेनेकर, संतोष जंगले, कारभारी जंगले, माजी सैनिक धनजी काचोळे यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.