Live : चेंबूरच्या बीपीसीएल कंपनीत भीषण स्फोट, अनेक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

चेंबुरच्या बीपीसीएल कंपनीत आज दुपारी ३ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात आग आणि धुराचे लोळ पसरले आहेत. स्फोटामुळे माहुल गाव हादरून गेले असून परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हवलण्याचे काम महापालिका कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत.

चेंबुरच्या बीपीसीएल कंपनीत भीषण स्फोट:

  • बीपीसीएलच्या हायड्रो क्रॅकर प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन लागली आग
  • अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल
  • दोन फोमच्या गाड्या घटनास्थळी दाखल
  • बीपीसीएलचे  ४१ कर्मचारी जखमी
  • प्रथमिक उपाचारानंतर २२ जणांना घरी सोडलं
  • १९ जणांवर चेंबूरच्या शुश्रुषा रुग्णालयात  उपचार सुरु
  • एकाची प्रकृती गंभीर
  • कंपनीत स्फोट होत असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी
  • २० अँब्युलन्स घटनास्थळी दाखल
  • आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश