
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अधुना भवानी गेल्याचं वर्षी विभक्त झाले. १७ वर्षांचा संसार दोघांनी संगनमताने मोडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर फरहान आणि श्रद्धा कपूर यांचं सूत जुळलं. पण आता फरहान गायिका व अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करत असल्याचं समोर आलंय. शिबानी आणि फरहान चांगले मित्र असून सध्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याची चर्चा आहे.
श्रद्धा आणि फरहान यांच्या प्रेमसंबंधांमुळेच अधुनाने फरहानबरोबरच नातं संपवल्याची चर्चा होती. अधुना गेल्यानंतर श्रद्धा आणि फरहान लिव इनमध्ये राहत होते. पण या दरम्यान फरहान वरचेवर अधूनालाही भेटत होता. यामुळे नाराज झालेल्या श्रद्धाने फरहानबरोबर ब्रेकअप केला. त्यानंतर फरहान पार्टी किंवा कुठल्याही कार्यक्रमांना एकटाच जात होता. पण गेल्या काही महिन्यांपासून फरहानबरोबर अचानक शिबानी दांडेकर दिसू लागली आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.
summary…farhan dating shibani dandekar




























































