
>> शुभांगी बागडे
प्रसूतीचा मार्ग हा जगातील सर्वात खडतर मार्ग आहे’, अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. खरोखरच नवजात बाळांसाठी आणि आईसाठीदेखील हा काळ पुनर्जन्म देणारा ठरतो. त्यातूनही बाळ कमी वजनाचे, कमी पोषण झालेले किंवा अकाली प्रसूत झालेले असल्यास त्याला विशेष उपचार पद्धतींची गरज असते. आईच्या गर्भात आणि प्रसूतीनंतर बाहेरच्या जगात अनेक समस्यांशी लढा देणाऱया या बाळांना वेगळय़ा वेगळय़ा आरोग्य उपचार पद्धती दिल्या जातात. यातीलच एक म्हणजे, कांगारू मदर केअर. गेल्या काही वर्षांत या उपचार पद्धतीचा अवलंब करून कमी वजनाच्या बाळांचे योग्य पोषण व वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बाळाच्या पोषणासाठी गरजेचं असतं ते आईचं दूध आणि माया. काही बाळं जन्मतःच अपुऱया कजनाची असतात. अशा बाळांना आईच्या दुधाबरोबरच काही कैद्यकीय सहाय्याचीदेखील गरज असते. या बाळांचं कजन काढण्यासाठी त्यांना उबेत म्हणजेच इनक्युबेटरमध्ये ठेकलं जातं. याला ‘वॉर्मर’ असंही म्हटलं जातं. मात्र हिंदुस्थानातील सर्वच रुग्णालयांमध्ये अशी सोय उपलब्ध नसते. अशा स्थितीत अपुरं कजन आणि नीट पोषण न झाल्याने अशा बालकांचा मृत्यू ओढकतो. इनक्युबेटर किंवा वॉर्मर उपचार खर्चिक असल्याकारणाने केवळ छोटय़ा गावांमध्येच नव्हे, तर शहरांमध्येही प्रत्येकाला ती परवडते असे नाही. या पार्श्वभूमीवर अशा बाळांसाठी ’कांगारू मदर केअर’ ही उपचार पद्धती वरदान ठरली आहे.
‘कांगारू उपचार पद्धती’ दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाची राजधानी बोगोटा इथे प्रथम अवलंबण्यास सुरुवात झाली. येथील डॉक्टर नील बर्गमन यांच्या रुग्णालयात कमी वजनाची अनेक बाळं अॅडमिट झाली. या बाळांना ऊबदार ठेवण्यासाठी इनक्युबेटर्स कमी पडली असता त्यांनी बाळांना ऊब मिळावी म्हणून आईच्या उष्णतेचा वापर करण्याचे ठरविले. बाळास आईच्या छातीवर, दोन स्तनांच्या मध्ये गुदमरणार नाही अशा पद्धतीने ठेवली असता बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांची वाढही चांगली झाली. यानंतर या डॉक्टरांनी या पद्धतीचा अवलंब करत अनेक निरीक्षणे व त्याचे फायदे नोंदवले. हळूहळू याचा प्रसार जगभर होत गेला. ‘युनिसेफ’ने १९८३ मध्ये या पद्धतीचा स्वीकार करत महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या महाराष्ट्रात जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून ३७ एसएनसीयूमध्ये ‘कांगारू मदर केअर युनिट’ साकारण्यात आली आहेत.
कांगारू जसा आपल्या पिलाला रात्रंदिवस आपल्या पोटाशी धरून ठेकतो, नेमक्या याच पद्धतीचा उपयोग या तंत्रातही केला जातो. या पद्धतीत बाळाला आईच्या छातीजवळ त्वचेचा थेट स्पर्श होईल अशा रितीने सरळ उभं ठेकलं जातं. बाळाचं डोकं एका बाजूला वळवून ठेवतात, तर मान थोडीशी पाठीच्या बाजूला कलती ठेवली जाते. हात आईच्या स्तनांव आणि पाय दुमडलेल्या स्थितीत आईच्या पोटाकर असतात. बाळाला ऊबदार टोपी आणि पायमोजे घातले जातात, तर पुढच्या बाजूने उघडं असणारं झबलं घातलं जातं. त्याच्या शी-शूसाठी खास कापूस घालून तयार केलेला लंगोट बांधला जातो. मग बाळाला खास तयार केलेल्या कांगारू पिशकीत ठेकलं जातं. अशा प्रकारे बाळाला जास्तीत जास्त वेळ त्याचं वजन योग्य प्रकारे वाढेपर्यंत ’कांगारू’मधे ठेवायचं असतं. कमीत कमी २ तास व जास्तीत जास्त २-४ तास बाळ आईच्या सान्निध्यात ठेवणं गरजेचं असतं. बाळ थोडं मोठं झालं की आईऐवजी बाळाचे बाबा किंवा कुटुंबातील इतर सदस्य बाळाला अशा प्रकारे ऊब देऊ शकतात. मात्र यासाठी त्यांची प्रकृती निरोगी असायला हवी.
कांगारू मदर केअरची उपयुक्तता दोन प्रमुख गोष्टींवर आधारित आहे. त्या म्हणजे. त्वचेचा स्पर्श आणि स्तनपान. या पद्धतीत आईची ऊब बाळापर्यंत पोहोचते. बाळाच्या आणि आईच्या त्वचेचा स्पर्श होतो. यासाठी बाळाला केवळ लंगोट आणि टोपी घातली जाते. बाळाचं शरीर गरम आणि ऊबदार राहिल्याने त्याचे वजन लवकर वाढते. ऊब निर्माण करण्यात बाळाची ताकद वाया जात नाही व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. हे काम कोणीही जबाबदार व्यक्ती करू शकते आणि आईला मदत होते.
‘कांगारू मदर केअर युनिट’ ही कमी खर्चिक आणि जास्त फायद्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये कमी वजनाच्या बालकांचे योग्यप्रकारे संगोपन करून त्यांना लागणारी सर्व काळजी घेतानाच मातेकडून परिपूर्ण स्तनपानही दिले जाते. यामुळे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी वजनाच्या म्हणजेच दोन हजार ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकांचे मृत्यू टाळण्यास मदत होते. या युनिटमुळे बाळाचे तापमान स्थिर राहते, बाळाला स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळते आणि विशेष म्हणजे जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव होतो.
बालकाची प्रकृती लवकरात लवकर स्थिर होऊन बालकाची मानसिक वाढही होते. १८०० ग्रॅमपेक्षा जास्त आणि २५०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या व प्रकृती स्थिर असणाऱया बालकांना जन्मानंतर लगेच केएमसी देणे योग्य ठरते. जर बाळाचं वजन १२०० ते १८०० ग्रॅमपर्यंत असेल तर त्याची परिस्थिती स्थिर झाल्यावर त्याला ’कांगारू’ पद्धतीत ठेवायला सुरुवात करतात. कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या किंवा जंतुसंसर्ग झालेल्या नवजात शिशूंसाठी ’केएमसी’ एक वरदानच ठरले आहे.
बाळाच्या शरीराचं तापमान कमी झाल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते. हा धोका टाळण्यासाठी ‘कांगारू मदर केअर उपचार पद्धती’ योग्य ठरते. या उपचार पद्धतीत आईच्या शरीराची ऊब बाळाला मिळून त्याचं तापमान नियंत्रित राहतं. त्याचं वजन तर झपाटय़ाने काढतं, शिवाय बाळ हवम तेव्हा आईचं दूध सहज पिऊ शकतं. या पद्धतीत बाळ आईच्या अगदी जवळ असल्याने त्याला जंतुसंसर्गाची भीती राहत नाही. त्याची प्रतिकारशक्ती वाढते. अनेकदा कमी वजनाच्या बाळांची प्रकृती इतकी नाजूक असते की, ती श्वाससदेखील घेऊ शकत नाहीत. मात्र इथे त्यांना आईच्या पोटात असल्यासारखं वाटतं आणि आईच्या श्वासोच्छवासाबरोबरच ते श्वास घेतं. आईच्या हृदयाचे ठोके ते ऐकू शकतं. त्यांची दृष्टी विकसित होते. आई व बाळामध्ये दृढ बंध तयार होतात. या सगळय़ाचा परिणाम म्हणजे त्यांच्या शरीराची आणि मेंदूचीदेखील चांगली वाढ होते. –
डॉ. स्वाती कुलकर्णी, नवजात शिशु तज्ञ
कमी वजनाच्या तसेच कुपोषित बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ ही उपचार पद्धती वरदान आहेच. मात्र ही पद्धती सर्व बाळांसाठीच उपयुक्त आणि आवश्यक आहे असं मी मानतो. यात आईचा स्पर्श, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे स्तनपान आणि बाळाच्या शरीराचं तापमान नियंत्रित होणं या तीन गोष्टींचा लाभ होतो. पूर्वीच्या काळातील जीवनशैलीनुसार बाळ जास्तीत जास्त वेळ आईच्या कुशीत असे. ज्यामुळे आपोआप आईच्या शरीराची ऊब त्याला मिळत असे. कांगारू मदर केअरपेक्षाही याला मंकी केअर असं म्हटलं पाहिजे. कारण अगदी त्याच पद्धतीने बाळाची सुरक्षितता, त्याचं पोषण व काळजी या पद्धतीत घेतली जाते. सुरुवातीचे तीन महिने बाळांना ब्रेस्ट कॉल आपोआप मिळतो. ते नैसर्गिक आहे. मात्र यानंतर स्तनपान पुरेशा प्रमाणात होण्यासाठी बाळाला आईने बाळाला जवळच ठेवलं पाहिजे व यासाठी ही पद्धती योग्य आहे.
– डॉ. प्रशांत गांगल (बालरोगतज्ञ व ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया, महाराष्ट्रचे प्रमुख)




























































