
दुर्गेश आखाडे। रत्नागिरी
श्रावण सुरू झालाय… महिनाभर मांसाहार बंद …शुद्ध शाकाहारी असं सांगणारी…श्रावण पाळणारी अनेक माणसं आपल्याला भेटतात. पण इथं तर चक्क वर्षभर झणझणीत मांसाहारी जेवण विकणारे एक हॉटेलच कडकडीत श्रावण पाळतयं…रत्नागिरीतील साईश भोजनालय गेली नऊ वर्ष श्रावण पाळत आहे. वर्षभर मत्स्याहरी जेवण देणाऱ्या या भोजनालयात श्रावण महिन्यात फक्त शाकाहारी जेवण मिळते.
काही हॉटेल फक्त शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असतात तर काही हॉटेलात मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही जेवण मिळतात. श्रावण महिना सुरू झाला तरी मांसाहार करणाऱ्यांसाठी मासांहारी जेवण हॉटेल मध्ये सुरू असते. तुम्ही आम्ही घरी श्रावण सुरू झाला की मांसाहार बंद करून घरात शाकाहार चालू करतो. रत्नागिरीतील हे हॉटेलही अगदी असंच श्रावण पाळते. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील राधाकृष्ण उर्फ बाळा गांधी यांनी नऊ वर्षांपूर्वी छोटेखानी साईश भोजनालय सुरू केले. या भोजनालयात घरगुती पद्धतीचे शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्याहरी जेवण मिळते. वर्षभर मांसाहारी जेवणासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असून हे हॉटेल श्रावण पाळते. श्रावण सुरू झाल्यापासून गौरी गणपती पर्यंत साईश भोजनालयात शाकाहारीच जेवण मिळते.
गेली नऊ वर्ष साईश भोजनालयाचा श्रावण महिना आता रत्नगिरीतील खवय्यांना माहीत झाला आहे.त्यामुळे या काळात शाकाहारी मंडळी या भोजनालायत आवर्जून येतात तर मांसाहारी खवय्ये श्रावण संपेपर्यंत दुसरी हॉटेलं शोधतात.
summary…ratnagiris-non-veg-hotel-keep-shravan
































































