‘महानंद’ला पावणेदोन कोटीचा तोटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून काम करणार्‍या ‘महानंद’ डेअरीला 2017-18 या आर्थिक वर्षात एक कोटी  67 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. दुधाच्या तुटवड्यामुळे  आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच डेअरीला प्रतिलिटर 30-31 रुपये दराने दुधाची खरेदी करावी लागली होती. त्यामुळेच डेअरीला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. महानंद डेअरीचा कारभार गेल्या चार वर्षांपासून तोट्यात सुरू आहे.

डेअरीला सभासद संघाकडून होणारा अपुरा दूधपुरवठा  व घटलेल्या विक्रीमुळे  डेअरीचा कारभार काहीसा डळमळीत झाला होता. 2016-17 मध्ये डेअरीला 7 कोटी 63 लाख रुपयांचा तोटा झाला होता, मात्र डेअरीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी व्यवस्थापनाबरोबरच कर्मचार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यंदा तोट्याचा आकडा सुमारे सहा कोटी रुपयांनी घटून पावणेदोन कोटीपर्यंत खाली आला आहे.