
सामना ऑनलाईन । सेलू
धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गेमेवाकडी येथे 19 वर्षीय युककाने गळफास घेऊन आज दुपारी आत्महत्या केली. मराठा आरक्षणाची धग कायम असतानाच आज धनगर आरक्षणासाठी राज्यातील पहिली आत्महत्या परभणी जिह्यात झाली आहे.
धनगर समाजाने एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यातच गोमेकाकडी येथे योगेश राधाकिशन कारके (19) याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सेलू येथील बैठकीला जाण्यासाठी कार्यकर्ते निघाले असतानाच योगेशने आत्महत्या केली. तातडीने कार्यकर्त्यांनी धाव घेतली, परंतु तोवर उशीर झाला होता. संतप्त नातलग व ग्रामस्थांनी योगेशचा मृतदेह सेलू पोलीस ठाण्यातच ठेवून अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला. तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, सहायक निरीक्षक डॉ. नितीन काशीकर आदींनी शासनाच्या वतीने 10 लाख रुपये मदत व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीचे लेखी पत्र दिले. त्यानंतरच उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. आत्महत्येपूर्वी योगेशने मोबाईलकरून बी. शिंदे यांना मेसेज पाठवला होता. त्यात ‘धनगर आरक्षणासाठी मी जीक देत आहे’ असे म्हटले आहे. मात्र हा मेसेज सेंट झाला नव्हता.
अंतरवाली टेंभीत मराठा आरक्षणासाठी विष घेतले
तीर्थपुरी – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. जालना जिल्हय़ाच्या घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे गणेश तुकाराम नन्नवरे (40) यांनी शेतात जाऊन विष घेतल्याची घटना आज घडली. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची दोन पानांची चिट्ठी त्यांच्या खिशात आढळली.
चिट्ठीत ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सरकारचे हे अपयश असून हे सगळं दिसत असताना मुख्यमंत्री काय झोपले का? तुमच्या राज्यात हे काय चाललं? आता अंत पाहू नका, आरक्षण देऊन टाका. आम्ही बरबाद झालो, पुढची पिढी होणार नाही. जर आरक्षण असते तर महेंद्र काटकर (नन्नवरे यांचा भाचा) नोकरीत असता. आम्हाला जगण्याची इच्छा आहे पण वाघासारखं जगवा. माझे मित्र व कुटुंबाने मला माफ करावे. आपला क्रांती हुतात्मा.’’ अशा चिठ्ठीचे एक पान व दुसऱ्या पानावर ‘‘आजचा पेपर वाचून निराश झालो. आता काहीही खरं वाटत नाही’’ असे म्हणत ‘आरक्षण,आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे 32 वेळा लिहिले.
घटना कळताच घनसावंगी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेकाड, उपनिरीक्षक अंकुश पाटोळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याकेळी गणेश नन्नवरे यांना हुतात्मा घोषित करा, त्याच्या कुटुंबाला तत्काळ 50 लाखांची मदत देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घेण्याची मागणी त्याच्या नातेकाईकांनी केली.





























































