
सामना ऑनलाईन । भिंवडी
सोने-चांदी, गाडय़ांमधील कारटेप, मोबाईल, रोख रक्कम लांबवणाऱ्या चोरटय़ांनी थेट विविध साडय़ांच्या ब्लाऊज पीसवरच डल्ला मारल्याची घटना भिकंडीत घडली. चोरटय़ांनी येथील गोडाऊनमधून 30 हजार रुपये किमतीचे ब्लाऊज पीस चोरून पोबारा केला असून या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भिकंडी येथील अंजूरफाटा भागात असलेल्या दापोडा रोडकर साडय़ांसाठी मॅचिंग ब्लाऊज पीसचा पुरवठा करणारे गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या शटरला असलेले टाळे तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. यावेळी आतील वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 35 ते 40 ब्लाऊज पीसचे बंडल चोरटय़ांनी लांबवले. विविध डिझाईनच्या या ब्लाऊज पीसच्या मुद्देमालाची किंमत 30 हजार रुपये असून गोडाऊन मॅनेजर दीपक खोत (40) यांनी याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.




























































