परळीत गॅरेजला लागलेल्या आगीत गॅरेजसह कार जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी

शहरातल्या पंचायत समिती कार्यालयाच्या समोर असलेल्या गॅस वेल्डिंगच्या दुकानाला रविवार रात्री १० च्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीत दुकानासह रंगवलेली कार जळून खाक झाली. घटनास्थळी नगर पालिकेच्या अग्निशमन दल दाखल झाल्याने या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवता आले.

आगेची माहिती मिळताच परळी नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण अद्याप समजले नाही. आग विझविण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून परिसरातील वीजपुरवठाही काही काळकरिता खंडित करण्यात आला होता. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.