अटलजी कायम स्मरणात राहतील – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अतीव दुख झाले आहे. त्यांचे नेतृत्व, दूरदर्शीपणाने त्यांना वेगळे स्थान दिले होते. अटलजी कायम आमच्या स्मरणात राहतील’. असे कोविंद यांनी टी्वटमध्ये म्हटले आहे.