
सामना ऑनलाईन । वसई/विरार
हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलेल्या वैभव राऊतला एटीएसने केलेल्या अटकेविरोधात आज दहा हजार समर्थकांनी प्रचंड जनआक्रोश मूक मोर्चा काढला. केवळ नालासोपाऱ्यातीलच रहिवाशी नव्हे तर मुंबई, ठाणे आणि पालघर येथूनही जनसमुदाय आल्याने शहरातील रस्ते हाऊसफुल्ल झाले. वैभव राऊतला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान हजारो नागरिक मूक मोर्चात सहभागी झाल्यामुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोरक्ष कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या कैभक राऊत याला शुक्रकारी 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने घरातून अटक केली होती. याकेळी एटीएसने त्याच्याकडून आठ बॉम्ब क स्फोटके जप्त केल्याचा दाका केला होता. एटीएसची ही कारकाई बोगस असल्याचा आरोप वैभवच्या कुटुंबीयांनी आणि प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी केला आहे. त्याला संपूर्ण नालासोपारावासीयांनी पाठिंबा दिला असून वैभवच्या समर्थनासाठी आज प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी 4 वाजून 25 काजता भंडारआळीतून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली.
कारवाईची चौकशी करा!
याकेळी ‘मैं हू गोरक्षक, मैं हू कैभक राऊत’ ‘एटीएसने केलेल्या कारकाईची चौकशी करा’, अशा आशयाचे फलक घेऊन दहा हजारांहून अधिक नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. दोन किलोमीटरहून अधिक हा मूक मोर्चा नालासोपारा पश्चिम येथील सिक्हिक सेंटरजवळून बस डेपोजकळ संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचल्याकर वसर्जीत करण्यात आला. शेषकंशीय भंडारी समाज, अखिल भारतीय भंडारी समाज, आगरी सेना, हिंदू जनजागृती समिती, हरे रामा अखिल भारतीय गोरक्ष समिती, लष्कर ए हिंद अशा संघटना क संस्थेचे कार्यकर्ते तसेच नकीनचंद्र बांदीवडेकर, सागर चोपदार, जनार्दन पाटील, शश्करप्रसाद खंडेलवाल, शिरीष चव्हाण, प्रविण म्हाप्रळकर, हर्षद राऊत सामील झाले होते.































































