
सामना प्रतिनिधी। लातूर
शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. पेट्रोलपंपावर थांबलेला ट्रकच अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या प्रकरणी येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात संदिपान उमाजी उर्फ बाबूराव शेप (वय ६२) रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई जि.बीड यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी आपला ट्रक लातूरातील रिंगरोडजवळील पेट्रोलपंपाजवळ उभा केलेला होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ट्रक (क्रमांक एम.एच.२६ एच ६१६७) पळवून नेला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.
summary…truck got stolen from petrol pump




























































