पच्चीसमरतबा समझाया उसकू, मतीनच्या कृतीवर ओवैसी भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

संभाजीनगर महापालिकेत अटलजींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करून मार खाणाऱ्या सय्यद मतीन याला ऑल-इंडिया-मजलिस-ए-इत्तेकहादुल-मुसल मीनचे (एमआयएम) प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी झापलं आहे. ओवैसी यांची या संबंधातील एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपची पुष्टी सामना करत नाही. मात्र या व्हायरल क्लिपमध्ये त्यांनी मतीनच्या कृत्याचा चांगलाच समाचार घेतल्याचं ऐकायला मिळत आहे.

या व्हायरल क्लिपनुसार, शेर ए औरंगाबाद या संघटनेच्या एका कार्यकर्त्याने ओवैसी यांच्याकडे मतीन याला मारहाण होतेवेळी बाकीचे नगरसेवक गप्प बसल्याची तक्रार केली. पण, त्यावर चिडलेल्या ओवैसींनी सदर कार्यकर्त्याला प्रश्न केला. ‘मतीनने जे केलं, ते स्वतःच्या मनाने केलं की पक्षाच्या धोरणानुसार केलं? हे बघा आधी’, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी मतीनच्या कृत्यावरून त्याला झापायला सुरुवात केली.

”पक्षाचं धोरण बाजूला सारून मनमानी वागणं चुकीचं आहे. पक्ष मोठा आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षासोबत विचार विनिमय करणं गरजेचं आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करणं अनिवार्य आहे. मी मतीनला कितीवेळा शांतपणे समजावून सांगितलं की, कोणताही निर्णय एकट्याने घेऊ नकोस. कारण, पक्ष मोठा आहे. तरीही तो असं का वागला, हे त्याला विचारा”, असं सांगत मतीनच्या कृत्यावर ताशेरे ओढले आहेत.

सर्वात आधी पक्ष येतो, पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. अशा प्रकारे एका माणसाने मनमानी केल्यामुळे पक्षाची आणि समाजाची बदनामी होते. मी कित्येक वेळेला मतीनला हैदराबादला बोलवून त्याच्या वागण्याबद्दल समज दिली होती. जर, तुम्ही पक्षाचे नगरसेवक आहात, तर तुम्हाला आधी पक्षाच्या इतर सदस्यांना निर्णयाबद्दल विचारलं पाहिजे. पण, न विचारता तुम्ही असं वागाल, तर पक्षाची बदनामी होणारच, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध केला होता. त्याच्या या कृत्यामुळे चिडलेल्या शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्याला चांगलंच चोपून काढलं होतं. त्यानंतर समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी मतीन याला अटकही करण्यात आली.

summery- ovaisi got angry on syed matin