
सामना ऑनलाईन । पुष्कर
खासगी विमानाची फ्लाईट क्लिअरंस फी न भरल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे विमान राजस्थानमधील किशनगढ विमानतळावर उड्डाणापासून रोखण्यात आले होते. जवळपास वीस मिनीटे विमानतळावर त्यांचे विमान ताटकळत होते. त्यानंतर एअरपोर्ट फी भरल्यानंतर त्यांच्या विमानाला हिरवा कंदील दाखविण्यात आला.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा व एचडी कुमारस्वामी हे कुटुंबासोबत राजस्थानमधील अजमेर येथे आले होते. अजमेर दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर ते बंगळुरूला परतत असताना विमानाची फी न भरल्याने त्यांच्या विमानाला फ्लाईट क्लिअरंस अथॉरिटीने उड्डाण करण्यापासून रोखले होते.
कुमारस्वामींचा शपथविधी ७ मिनिटांचा; खर्च ४२ लाख
‘साधारणपणे कोणतेही खासगी विमान विमानतळावर येण्याआधीच त्यांना फ्लाईट क्लिअरंसची फी भरावी लागते. मात्र कुमारस्वामी यांच्या विमानाची फी भरलेली नसल्यामुळे त्यांना परत जाण्यापासून रोखण्यात आले होते’, असे विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले.
SUMMARY : HD Kumaraswamy’s flight from Ajmer delayed over fee issue





















































