जम्मू कश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात लष्कराच्या जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर जवानांनी त्यांना अटक केली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहे.

शनिवारी पुलवामा जिल्ह्यातील राजापोरा येथून जवानांनी चार जणांना अटक केली आहे. ते चौघे दहशतवाद्यांना व दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे समोर आले आहे. त्या चौघांकडून शस्त्रास्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.

summary : Four terrorists arrested after a brief gunfight with security forces in Kupwara district