
सामना ऑनलाईन । मुंबई
देशात दिवसागणिक पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या दरवाढीमुळे ऐन सणासुदीत इंधन चांगलेच भडकण्याची चिन्हे आहेत. चार महानगरांत डिझेल 14 ते 17 पैशांनी महागले असून हा भाव नवा उच्चांक करण्याच्या उंबरठ्यावर आहे. दिल्ली व कोलकात्यात 14 पैशांनी दरवाढ झाली असून अनुक्रमे 69.75 आणि 72.60 रुपये लिटर झाले आहे. मुंबईत डिझेल 15 पैशांनी महाग होत 74.05 रुपये झाले आहे. पेट्रोलही 85.60 रुपये झाले आहे. चेन्नईतही 17 पैशांची वाढ झाली असून दर 73.71 रुपये झाला आहे. दिल्लीत या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल 1.87, तर डिझेल 1.93 रुपयांनी महागले आहे.



























































