वलांडी शिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला  मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वलांडी

वलांडी (ता. देवणी) येथे शनिवारी छिन्नविच्छिन्न  अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बाबुराव शिंदे (वय 68) यांचा मृतदेह शनिवारी दुपारनंतर वलांडी दरेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतातत सडलेल्या अवस्थेत आढळुन आला. मृताचे शवविच्छेदन वलांडी प्राथमिक अरोग्य केंद्राचे डाँ. गणाचार्य यांनी घटनास्थळीच केले. सायंकाळी उशीरा मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सडलेल्या स्थितीत केवळ धड सापडले, मुंडके आणि पाय गायब होते.

याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गजानन चौधरी म्हणाले की, मृत्यु हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर लक्षात येणार आहे.