
सामना ऑनलाईन । मुंबई
आठवड्याच्या सुरुवातीलाच हार्बर रेल्वेमार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कॉटनग्रीन स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक उशिराने सुरू असून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, रेल्वेकडून ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
summary- harbor railway disrupted due to broken overhead wire

























































