डोंबिवली-चिपळूणच्या प्रवासात पर्समधून ३ लाखाचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

डोंबिवलीहून चिपळूणकडे येत असताना एका महिलेच्या पर्स मधून ३ लाख ४८ हजार ७७३ रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या महिलेने हे दागिने एका डब्यात भरून तो डबा पर्स मध्ये ठेवला होता.

अनंत झगडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. त्यांची पत्नी डोंबिवलीहून चिपळूणला रेल्वे गाडीने आली. चिपळूण रेल्वे स्थानकात उतरुन त्यापुढे बसने गुढे फाटा येथे आल्या. तिथून डमडमने त्या पाथर्डी येथे घरी पोहोचल्या. घरी आल्यावर त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्याचा डबा नव्हता. त्यांनी डब्यात ३ लाख ४८ हजार ७७३ रुपयांचे दागिने ठेवले होते. चोरट्याने ते लंपास केले.