जुन्नरमध्ये रेशनिंगच्या गव्हाचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जुन्नर

जुन्नर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग आणि महसूल विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 165 गोणी गहू जप्त केला आहे. जप्त केलेला गहू हा रेशनिंगसाठी वितरीत केला जाणारा शासकिय साठा असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी विलास रामसिंग परदेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जुन्नर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिलालेल्या माहितीनूसार परदेशपुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामामध्ये अनधिकृतपणे गव्हाचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेउन टाकलेल्या छाप्यात जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा 165 गोणी गहू जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला गहु जुन्नर तहसीलदार यांच्या ताब्यात दिला आसून गव्हाचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत याबाबत पोलीस आणि महसूल अधिकारी तपास करत आहेत.