
सामना ऑनलाईन, मुंबई
लालबाग-परळमध्ये गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळत आहे. याच गर्दीला मोबाईल चोरांनी नेहमीप्रमाणे टार्गेट केले आहे. गेल्या चार दिवसात जवळपास 135 मोबाईल चोरीला गेल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. आज पाच दिवसांचे गणपती गेल्यानंतर भक्तांचा महापूर लालबाग-परळ भागात येणार आहे. त्यामुळे या मोबाईल चोरांना रोखायचे कसे असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. पोलीस यंत्रणा सतर्प आहे. मात्र तरी देखील चोरटे शिताफिने मोबाईल चोरत आहेत. पोलीस सीसीटीव्हीतून गर्दीवर बारीक वॉच ठेवत असले तरी सुद्धा चोरटे आपले काम फत्ते करीत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी संपर्प साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.


























































