‘देश का चौकीदार चोर है’, हे सिद्ध झालं – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल करारप्रकरणी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशात वादळ उठले आहे. शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ओलांद यांच्या वक्तव्याचा आधार घेत पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्स कंपनीचे मालक अनील अंबानी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी लष्कराचा अपमान केला आहे. मोदी आणि अंबानी यांनी मिळून लष्कराचा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘राफेल’साठी मोदी सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवले!

पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी म्हणाले की,फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी राफेल करारासाठी अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देण्यात त्यांचा हात नसल्याचे म्हटले. अंबानी यांना राफेल कराराचे कंत्राट मोदी यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. याचा अर्थ फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मोदींना चोर म्हटले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच अरुण जेटली आणि निर्मला सीतारमण हे राफेल करारावर बोलतात परंतु पंतप्रधान मोदी का नाहीत? ओलांद यांच्या वक्तव्यावर मोदी कधी बोलणार? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

राफेलवरील वाक्युद्ध

हिंदुस्थानने ‘सुखोई’ विमाने बनवली; मग ‘राफेल’ का नाही, ‘एचएएल’च्या माजी प्रमुखांचा सवाल

तसेच या कराराद्वारे मोदींनी अंबानी यांना 130 कोटी रुपयांचे गिफ्ट दिले आहे. मोदींनी सैनिकांच्या, नागरिकांच्या खिशातील पैसे काढून अंबानींच्या खिशात टाकले. अंबानी यांच्या कंपनीने कधीच विमान तयार केलं नाही, मग कंत्रात कशाच्या आधारावर दिलं? असाही सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. शेवटी ‘देश का चौकीदार चोर है’ असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर घणाघात केला.

वादग्रस्त राफेल विमानाची एअर मार्शल नांबियार यांनी घेतली टेस्ट ड्राईव्ह

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –

  • देश का चौकीदार चोर है – राहुल गांधी
  • मोदी सरकार जेवढे बोलते त्यापेक्षा जास्त लपवते – राहुल गांधी
  • राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी – राहुल गांधी
  • राफेल सौद्यावर अरूण जेटली, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण बोलतात पण मोदी नाही- राहुल गांधी
  • राफेल सौदा म्हणजे मोदींचे अंबानींना 130 हजार कोटींचे गिफ्ट – राहुल गांधी
  • 526 कोटींचे विमान 1600 कोटींनी खरेदी केलं गेलं आहे – राहुल गांधी
  • सैनिक, नागरिकांचे पैसे अंबानींच्या खिशात घातले – राहुल गांधी
  • अंबानी यांच्या कंपनीने कधीच विमान तयार केलं नाही, मग कंत्रात कशाच्या आधारावर दिलं? – राहुल गांधी
  • पंतप्रधानांच्या सांगण्यावरून अंबांनीना कॉन्ट्रॅक्ट मिळाले – राहुल गांधी
  • फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणतात मोदी चोर आहेत – राहुल गांधी
  • राफेल सौद्यावर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद