नोटाबंदीचा निर्णय अर्थमंत्र्यांना अंधारात ठेऊन घेतला – भाजप खासदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

मी पक्षाने घेतलेल्या जनहितविरोधी निर्णयाला वाचा फोडतो़ पक्षाचे ज्या निर्णयाने नुकसान होऊ शकते, हेच माझे प्रमुख मुद्दे आहे. नोटाबंदी हा निर्णय तर देशाच्या अर्थमंत्र्यांना अंधारात ठेऊन घेतला आहे. यासाठी मला कुणी बंडखोर म्हटले तरी चालेल, त्याची कधीही पर्वा करीत नाही, असे खामोश स्टाईल वक्तव्य सिने अभिनेते व राज्यसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काटोल येथे केले.

राफेल ठरणार सरकारचा ‘महाकाळ’, भाजपला घरचा आहेर

काटोल फेस्टिव्हलनिमित्त शनिवारी सिन्हा यांनी ‘युवा संसद’ या विशेष कार्यक्रमासाठी हजेरी लावली. क्रीडा संकुलमध्ये आयोजित कार्यक्रमात खासदार सिन्हा पुढे म्हणाले, माझ्यासारखेच महाराष्ट्रात विदर्भपूत्र आमदार डॉ. आशिष देशमुख शेतकरी, बेरोजगारांसाठी सरकारविरोधात बोलून सत्य समोर आणतात. त्यांनी भाजपा सोडण्याची सध्यातरी घाई करू नये. राजीनामा हा पर्याय नसल्याचाही सल्ला यावेळी खासदार सिन्हा यांनी आमदार देशमुखांना दिला.