
सामना प्रतिनिधी । मुंबई
गणरायाने निरोप घेतल्यानंतर आता मान्सूनही येत्या शनिवारपासून मुंबईसह महाराष्ट्रातून काढता पाय घेणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून सहसा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गायब होतो. परंतु यंदा त्याने चार आठवडे मुक्काम ठोकला.
म्हणून मान्सूनचा अलविदा
वार्याची दिशा बदलली असून चक्रवाती वारे राजस्थानच्या दिशेकडे गेले आहेत. गुरुवारपासून ही परिस्थिती तयार झाल्याने मान्सूनने महाराष्ट्रापासून काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात शनिवारी मान्सून मुंबईसह महाराष्ट्रातून पूर्णपणे गायब होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
- हिंदुस्थानात दरवर्षी सरासरी 70 टक्के पाऊस पडतो. परंतु यंदा 9 टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे यंदा शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
- देशातील मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र सिंचनाखाली नसल्यामुळे 263 दशलक्ष शेतकर्यांना या पावसाचा फायदा होत नाही.
- भात, ऊस, मका, कापूस, सोयाबीन या पिकांना कमी पावसाचा फटका बसला.

























































