खोटे मेसेज व्हायरल केल्याबद्दल लेफ्टनंट कर्नल यांची पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेश पवार, सातारा

साताऱ्यातील सैनिकी शाळेतील ६० हून विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा एक मेसेज सोशल मिडीआवर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र हा मेसेज खोटा असून तो पसरवणाऱ्या मंडळींविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेफ्टनंट कर्नल आर.एस.एस नलावडे यांनी केली आहे. सोशल मिडीआवर फिरत असलेल्या संदेशात सैनिकी शाळेतील ६० ते ७० मुलांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची थाप मारण्यात आली होती. हा मेसेज तयार करणाऱ्यांवर आणि पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी नलावडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पत्राद्वारे केली आहे. शहरातील स्वाईन फ्लूच्या साथीमुळे फक्त ४ मुलांना त्याची लागण झाली होती आणि काही विद्यार्थी संसर्गजन्य तापामुळे आजारी होते असं या पत्रात लिहलं आहे.