
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील बडगाम येथे शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात हिंदुस्थानी सैन्याला यश आलं आहे. तर अन्य एका चकमकीत सैन्याचा एक जवानही शहीद झाला आहे. बडगाम येथे अद्याप चकमक सुरू आहे.
बुधवारी रात्री सैन्याला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गुरुवारी सकाळी हिंदुस्थानी सैन्याने जम्मू कश्मीर पोलिसांच्या साथीने अनंतनाग, बडगाम आणि नूरबाग या तीन भागांत शोधमोहीम सुरू केली होती. यांपैकी अनंतनाग आणि नूरबाग या परिसरांमध्ये प्रत्येकी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे.
summary- two terrorists killed in jammu and kashmir




























































