अखेर नाना पाटेकर बोलले, अभिनेत्री तनुश्रीने केला होता गैरवर्तनाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने हिंदी चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान सेटवर दिग्गज कलाकार नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. 10 वर्षांपूर्वीची ही घटना तनुश्री पुन्हा एकदा उकरून काढली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर पहिल्यांदाच नाना पाटेकर यांनी तोंड उघडले असून हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. ‘तनुश्रीचे आरोप बिनबुडाचे असून या प्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे’, असेही नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पाटेकरांनी चुकीच्या पद्धतीने हात लावला, तनुश्रीचा 10 वर्षांनी पुन्हा आरोप
तनुश्रीच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी- आमीर खान

नाना पाटेकर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना तनुश्री दत्ता हिच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच तनुश्री ज्या सेटवर ही घटना घडली असा आरोप करत आहे तेथील संपूर्ण यूनिटचा मला पाठिंबा मिळत असल्याचे नाना म्हणाले.

गैरवर्तन याचा अर्थ काय होतो? त्यावेळी सेटवर 50 ते 100 लोक उपस्थित होते. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करता येईल याची मी सध्या माहिती घेत आहे. लोकं काहीही बोलू शकतात, आरोप करू शकतात. परंतु मी माझं काम करणं थांबवणार नाही, असे नाना पाटेकर म्हणाले.

काय आहे नक्की प्रकरण?
अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया तनुश्री दत्ता हिने 10 वर्षापूर्वी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटादरम्यान दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप तनुश्रीने केला. नाना पाटोकरांनी सेटवर मला चुकीच्या पद्धतीने हात लावला होता असा आरोप तिने केला होता. 2009 मध्ये तनुश्रीने हा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठा भूकंप झाला होता.