मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीला सुपर चॅलेंज, विरोधक स्वीकारणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विरोधकांनी कितीही दिशाभूल केली आणि आमच्याविरुद्ध महागठबंधन केले तरी त्यांना बिलकूल यश मिळणार नाही. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्यासोबत एका व्यासपीठावर यावे आणि त्यांनी 15 वर्षांत राज्यासाठी नेमके काय केले हे सांगावे. चार वर्षांहून कमी कालावधीत आमच्या सरकारने काय कामे केली हे आम्ही आकडेवारीसह सांगू, असे आव्हान आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीतील समारोपाच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.

आघाडी सरकार सत्तेवर असताना जमिनीचे सिंचनच झाले नाही. उलट तिजोऱ्यांचेच मोठ्या प्रमाणावर सिंचन झाले आणि महाभ्रष्टाचार झाला, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी आज केला. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपवर टीका करण्यात दंग असताना भाजपची यंत्रणा मात्र नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेगाने निवडणुकीच्या कामाला लागली आहे. भाजपतर्फे राज्यातील बूथनुसार 60 टक्के प्रमुख नेमण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक प्रमुखाने 55 टक्के मतदार निवडणुकीच्या दिवशी बाहेर येतील याची जबाबदारी घ्यावी असे नियोजन करण्यात आल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.