सॅमसंग आणि गुगल रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) साठी एकत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> स्पायडरमॅन

शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस (SMS) चे अपग्रेड असलेल्या रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) क्षेत्रात आता सॅमसंग आणि गुगल इंक एकत्ररीत्या काम करणार आहेत. सॅमसंगच्या मोबाईल प्लॅटफॉर्मवर आता यामुळे सॅमसंग ग्राहकांना ग्रुप चॅट आणि व्हिडीओ कॉल्सच्या जोडीलाच कुठल्याही ऍपच्या मदतीशिवाय मोठय़ा फाइल्स सहजपणे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळणार आहे. ऍण्ड्राइड मेसेजेस आणि सॅमसंग मेसेजेस सहजपणे एकमेकांबरोबर कार्यरत राहतील आणि रिच कम्युनिकेशन सर्व्हिस (RCS) चे कव्हरेजदेखील वाढवता येईल अशा दिशेने या दोन्ही कंपन्यांचे प्रयत्न असणार आहेत. सॅमसंगच्या Galaxy ए8 आणि ए8 Plus या मोबाईलमध्ये प्रथम ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.