
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इंडियन आयडॉलमध्ये आपल्या गायनाने व बासरी वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या रिजवान खान या गायकाने प्रेयसीची गळा चिरून हत्या केली. नंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन पुलाजवळ फेकल्याची भयंकर घटना दिल्लीत घडली आहे.
रिजवान उत्तम बासरी वाजवायचा व गाणेही गायचा. संगीत क्षेत्रातच करिअर करायचे त्याचे स्वप्न होते. यामुळे तो मिळेल ते छोटे मोठे गाण्याचे कार्यक्रम करायचा. काही महिन्याभरापूर्वी हजरत निजामुद्दीन दर्ग्यात त्याचा कार्यक्रम झाला. यावेळी त्याची ओळख सायमा या तरुणीबरोबर झाली. रिजवानच्या गायनाने सायमा प्रभावित झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याच दरम्यान रिजवानची इंडियन आयडॉल स्पर्धेसाठी निवड झाली. यामुळे सायमा भलतीच खुश होती. पण रिजवान अंतिम स्पर्धेतून बाद झाल्याने नाराज झालेल्या सायमाने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. या दरम्यान तिने दुसऱ्या तरुणाबरोबर मैत्री केली. जेव्हा हे रिजवानला कळाले तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
त्यानंतर रविवारी रिजवानच्या भावाने समीरने भांडण संपवण्यासाठी सायमाला घरी बोलावले. सायमा रिजवानच्या घरी आली. पण तेव्हाही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात रिजवानने धारदार चाकूने तिचा गळा चिरला. नंतर समीरच्या मदतीने तिच्या शरीराचे तुकडे केले व ते मोठ्या बॅगेत भरले. त्यानंतर येथील बारापुला नदीजवळील पुलावर ही बॅग त्यांनी फेकली व पळ काढला. त्यानंतर दोन दिवसांनी रिजवान स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस समीरचा शोध घेत आहेत.
summary-indian idol killed gf


























































