
सामना ऑनलाईन, थिरुवनंतपुरम
केरळमध्ये अलीकडेच झालेला धुंवाधार पाऊस, महापूर यामध्ये ५०० पेक्षा अधिक जण ठार झाले असताना आता येत्या तीन-चार दिवसांत केरळात अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय केरळ, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा अंदाजही वर्तवला आहे. ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल, असे हवामान विभागाने म्हटले असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.





























































