
सामना ऑनलाईन । राजकोट
हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडीजच्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पृथ्वी शॉनं गाजवला. आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील टीम इंडियासाठी चांगली राहिली आहे. कोहली आणि रिषभ पंत यांची जोडी दमदार फलंदाजी सुरू आहे. पण महत्वाची बाब म्हणजे रिषभ पंत हा कोहली पेक्षा वेगानं खेळतो आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा विराट कोहली 72 तर रिषभ पंत अवघ्या 17 धावांवर खेळत होता. मात्र रिषभ पंतने 110.98 या स्ट्राईक रेटने फलंदाजी सुरू ठेवली. आपलं अर्धशतक देखील त्यानं षटकार खेचून पूर्ण केलं. मात्र त्याच वेळी कोहलीचा स्ट्राईक रेट हा 54.50 इतका होता. विराट कोहलीनं चौकार मारून शतक केलं. पण त्याच्या पाठोपाठ रिषभ पंतही 90 पर्यंत पोहोचला. 92 धावांवर असताना देवेंद्र बीशूच्या चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नात पंत फसला आणि बाद झाला. मात्र त्याच्या झंजावाती खेळीने टीम इंडियाची धावसंख्या वेगानं पुढे सरकली.





















































