
सामना ऑनलाईन । मुंबई
रुपयाची घसरण, वाढती महागाई या स्थिती दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज पतधोरण जाहीर केले. आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करेल अशी शक्यता होती. मात्र रेपो रेट कायम ठेवला आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या पतधोरणानुसार रेपो दर स्थिर 6.50 टक्के इतका राहणार आहे. कर्जांवरील व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताच शेअर बाजारात त्याचा परिणाम पाहायला मिळाला. बाजार जवळपास 700 अंकांनी खाली पडला.


























































