कांदिवलीमध्ये प्रदूषण मंडळाच्या धाडीत दीड टन प्लास्टिक पिशव्या जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शुक्रवारी मुंबईत कांदिवली पूर्व भागातील हनुमान नगरात एका दुकानावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. उमर प्लास्टिक पेपर्स असे धाड टाकलेल्या दुकानाचे नाव असून त्याच्या मालकाला पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.

मुंबई आणि राज्यभरात गेल्या काही दिवसापासून प्लास्टिकचा अनधिकृतपणे वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभर प्लास्टिक बंदीची मोहीम शासनाने तीव्र केली असून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या धाडीत सुमारे दीड टन प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक रोल जप्त केला आहे. या कारवाईत महंमद खान, एस. बी. माने, संजय भोसले, स. ह. पडवळ, डी. पी. कोपरकर, मधुकर इगवे, गजानन पवार, अजित देशमुख, संदिप पाटील आदींचा सहभाग होता.