काँग्रेस-बसपाची लोकसभेसाठी युती होईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राज्यातील युती आणि केंद्रातील युतीमध्ये फरक असतो असे नमूद करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेसाठी काँग्रेस आणि बसपा यांची युती निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत बसपासोबत येण्यास तयार झाली नाही तरी काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही, मात्र चर्चेसाठी आपण नेहमीच उपलब्ध असतो, असेही राहुल म्हणाले.