
सामना ऑनलाईन । अयोध्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या रॅलींमधून ‘जय श्रीराम’चे नारे तेवढे देतात. पण राम मंदिराच्या उभारणीवर चकार शब्द कधी काढत नाहीत, असे सांगतानाच लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिरासाठी कायदा बनवून अध्यादेश काढला नाही तर भाजपचा अंत अटळ आहे, असा इशारा अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आज दिला.
राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या अजेंडय़ावर आहे. त्यामुळेच संसदेत कायदा बनवून राम मंदिर उभारण्यात यावे, अशी देशातील जनतेची रास्त अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करण्यासाठी सरकार कायदा करू शकते. मग राम मंदिरासाठी कायदा का करू शकत नाही, असा सवाल आचार्य सत्येंद्र दास यांनी केला. विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल हे हयात असते तर भाजप सत्तेवर येताच राम मंदिर उभे राहिले असते, असेही ते म्हणाले.
मोदी आणि योगींना राम मंदिर नकोच – परमहंस दास
अयोध्येत राम मंदिर बनावे, असे मुळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांनाही वाटत नाही, असे संतप्त उद्गार महंत परमहंस दास यांनी काढले आहेत. त्यांनी 1 ऑक्टोबरपासून राम मंदिराच्या उभारणीच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
summary- satyendra das slams pm modi over ram mandir



























































