
सामना ऑनलाईन । उन्नाव
राम मंदिराच्या मुद्दय़ावर मी अयोध्येत भगवान रामाचे मंदिर उभारण्यासाठी लढा देणाऱया साधू -संतांच्या बाजूने आहे . भले मी भाजपचा खासदार असेन. पण जो काही आहे तो प्रभू रामचंद्रांच्या कृपेने. त्यामुळे 2019 च्या आधी राम मंदिराची उभारणी झाली नाही तर भाजपला रामराम करण्याचा आपला निर्धार असल्याचा संतप्त इशारा उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी दिला. देशात भाजपला जी सत्ता मिळाली आहे ती प्रभू रामचंद्रांची कृपा आणि संतांच्या योगदानाने मिळालीय हे विसरू नका, असेही ते म्हणाले.
summary- sakshi maharaj warns bjp over ram mandir
























































