फेसबुकचे मिशन लोकसभा; प्रचाराच्या खऱ्याखोट्या बातम्या, भडकावू मजकूर यावर लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
facebook-friend-1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवरून फेक न्यूज शेअर केल्या जाऊ नयेत यासाठी फेसबुक कंपनी कामाला लागली आहे. फेसबुक टास्क फोर्स उभारून प्रचाराच्या खऱ्याखोटय़ा बातम्यांची शहानिशा करणार आहे.

फेसबुकच्या 87 लाख युजर्सचा डेटा चोरीला गेल्यामुळे फेसबुक वादाच्या भोवऱ्यात आहे. यामध्ये पाच लाख हिंदुस्थानी युजर्सचा समावेश आहे. 2016 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाचा हस्तक्षेप ओळखण्यात फेसबुक अपयशी ठरले होते. यानंतर आता फेसबुक खडबडून जागे झाले आहे. पुढील वर्षी हिंदुस्थानात लोकसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने जागल्याच्या भूमिकेत राहायचे ठरवले आहे. विविध तज्ञ आणि राजकीय पक्षांच्या मदतीने फेसबुक काम करणार आहे. त्यांच्या टास्क फोर्समध्ये सिक्युरिटी एक्सपर्ट तसेच कंटेट स्पेशालिस्ट असतील.

ही तज्ज्ञ मंडळी हिंदुस्थानातीलच असतील. ती निवडणुकीच्या खऱ्या बातम्या आणि राजकीय प्रचाराच्या पेरलेल्या बातम्या, द्वेषाला खतपाणी घालणारे लेखन, जाहिराती यांचा शोध घेतील, असे कंपनीचे ग्लोबल पॉलिसी सोल्युशनचे उपाध्यक्ष रिचर्ड ऍलन यांनी सांगितले. केवळ हिंदुस्थानच नव्हे तर जगभरात मोकळ्या आणि पारदर्शी निवडणुका व्हाव्यात, असे फेसबुकला वाटते.

summary- facebook to keep watch on loksabha elections