
सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया
उत्तर कॅलिफोर्नियातील हेल्ड्सबर्ग येथून चक्क मोठा हातोडा शुक्रवारी रात्री चोरांनी लांबवला आहे. तसेच वोगिट मूर्ती परिवार फाऊंडेशन यांनी या हातोड्याची प्रतिकृती बनविली आहे. तर पळवून नेलेल्या या हातोड्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
५ ऑक्टोंबर रोजी हेल्ड्सबर्ग येथून काही अज्ञात चोरट्यांनी समुदाय केंद्र येथे ठेवलेला 800 पाऊंड आणि 21 फूट लांबीचा हातोडा पळवला आहे. तसेच समुदाय केंद्राच्या ठिकाणी ठेवलेल्या या हातोड्याची रवानगी लवकरच दुसऱ्या जागेवर करण्यात येणार होती, असं तेथील डॅरिअल ईरकेल या पोलीसाने सांगितले. या हातोड्याची किंमत $15,000 (11,05,290) रुपये एवढी आहे. तर चोरीला गेलेल्या या हातोड्याची बातमी हेल्ड्सबर्गमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. वोगिट मूर्ती परिवार फाऊंडेशन यांनी चोरांना जो कोणी पकडून आणणार त्यांच्यासाठी $1000 (73,686 रुपये) चे बक्षिसही जाहीर केले आहे.






























































