रेल्वे रुळाला तडे, हार्बर बोंबलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील मस्जिद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक आठवच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत झाली. पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती काम हाती घेतले. मात्र या दरम्यान पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे किंवा रुळाला तडे गेल्याने अनेकदा प्रवाशांना त्याचा फटका बसतो.