शिवसेना हेच महाराष्ट्राचे उज्वल भविष्य – आनंदराव जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

‘शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या मातीशी एकरुप झालेला आणि महाराष्ट्राच्या भल्याचा क्षणोक्षणी विचार करणारा पक्ष असून शिवसेना हेच महाराष्ट्राचे भविष्य आहे. यासाठी जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 50 हजार यानुसार दीड लाख शिवसैनिकांची नोंदणी करुन शिवसेनेच्या भगव्याचे तेज वाढवावे’, असे तडाखेबंद आवाहन शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी वसमत व औंढा नागनाथ येथील शिवसेनेच्या बैठकीत बोलताना केले.

शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आज जिल्हा दौऱ्यावर आले असुन पाचही तालुक्यात आढावा व संघटनात्मक बांधणी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. वसमत येथे आयोजीत बैठकीला जिल्हाप्रमुख संतोष बांगर, माजी मंत्री तथा आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, सहसंपर्वâप्रमुख राजेंद्र शिखरे, लोकसभा संघटक डॉ. बी.डी. चव्हाण, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. वसमत व औंढ्यात संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी जि.प. सर्कलनिहाय गाव पातळीवरील शाखांची स्थिती तसेच शिवसैनिकांच्या अडचणी यासंबंधीची माहिती घेतली.

यावेळी आनंदराव जाधव म्हणाले की, आगामी वर्षभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात जास्तीत-जास्त मतदारांची नोंदणी, शिवसेनेच्या बाजुने असलेल्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, तसेच शिवसंपर्क अभियान राबवुन शिवसैनिकांची नोंदणी देखील करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेच्या कामांचा प्रसार आणि प्रचार घरोघरी जाऊन करावा, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचे पाईक म्हणुन भगव्याचे तेज वाढवत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.

वसमत येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजीत कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा संपर्वâप्रमुख आनंदराव जाधव यांच्या हस्ते आज १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.