
सामना ऑनलाईन । पाटणा
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी बिहारमध्ये बेगुसराई जिह्यात घडली आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाले आहे.
एआरएएसएफचा नेता सुशील कुमार याला भेटण्यासाठी कुमार हा पाटणात एम्समध्ये 40-50 समर्थकांसह रविवारी गेला होता. त्यावेळी या समर्थकांना सुरक्षा रक्षकाने रोखले यावरून या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून एम्सच्या डॉक्टरांशी गैरवर्तन केले. या आरोपावरून कुमारवर आणि त्याच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
























































