
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
भाजपचे देवळोली गावच्या महिला सरपंच मनस्वी मनोज भंडारकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. उरणचे शिवसेना आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन उरण विधानसभा मतदारसंघातील पनवेल तालुक्यातील देवळोली गावच्या भाजपच्या महिला सरपंच मनस्वी मनोज भंडारकर, मनोज भंडारकर, स्वप्निल पाटील, संजय बडवी, दत्ता पाटील, गणपत नामा पाटील, मानसी महेंद्र भंडारकर, गणपत वाघमारे, काशिनाथ वाघमारे, संतोष हिरामण नाईक, सुमन बाळाराम कातकरी, गुलाम दत्तू वाघमारे, लवशा लक्ष्मी कातकरी, राम वाघमारे, रविंद्र वाघमारे, आलका वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उरण येथील आमदार मनोहर भोईर यांच्या संपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे तालुक्यातील भाजपला पनवेल तालुक्यात मोठा धक्का बसला आहे.
यावेळी ग्रामीण पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, शहर पनवेल तालुका प्रमुख परेश पाटील, जेष्ठ शिवसैनिक काशिनाथ कांबळे, विभाग प्रमुख विष्णू लहाने, विभाग प्रमुख सुधिर पाटील, शाखाप्रमुख हसुराम दिघे, राजेंद्र पाटील, अमोल देशमुख, अविनाश गव्हाणकर, निलेश गव्हाणकर, रमेश देशमुख, राहुल सूर्यराव, धीरज सूर्यराव, कृष्णा सूर्यराव, सुनील देशमुख उपस्थित होते.


























































