
सामना प्रतिनिधी । डोंबिवली
डोंबिवलीजवळ खंबालपाडा येथे पायल मार्बल्स जवळ नाले सफाई करत असताना एक कामगार मॅनहोलमध्ये गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी दोन कामगार आत उतरले ते बाहेरच आले नाहीत. त्यांचाही आत गुदमरून मृत्यू झाला.
देविदास चंद्रभान पाजगे (30), महादेव धोंडिबा झोपे (38) व चंद्रभान झोपे अशी तीन मृत कामगारांची नावे आहेत. एमआयडीसी मार्फत फेज 1 मध्ये देखभाल दुरुस्तीचे काम मार्बल पायल समोर खंबालपाडा येथे सुरू होते. दुपारी चार साडेचारच्या दरम्यान काम करत असताना ही दुर्घटना घडली. तिन्ही मृतदेह पोस्ट मार्टेम करण्यासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले असून टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































